पुणे : खडकवासला धरणातून मंगळवारी (ता. १२) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास १३ हजार १४२ क्युसेक पाणी सोडले जाणार आहे.
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा ११,९०० क्युसेक विसर्ग वाढवून १३ हजार १४२ क्युसेक करण्यात येणार आहे. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे.