मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी महायुतीमधील घटक पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून दिली आहे.
तसेच या शपथ विधीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल आठ दिवसापूर्वी जाहीर झाल्यानंतर सर्वांना शपथविधी कधी होणार याची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
यावेळी अनेक राज्यातील मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी उपस्थितीत राहणार आहेत, असंही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून सांगितले आहे.
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी
विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
राज्य में महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह
विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री श्री…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 30, 2024