परंडा शहरातील घनकचरा व्यवस्थापनात नागराळ इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीचे कंत्राट रद्द
मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांचे आदेश
सुरेश घाडगे
Paranda News : परंडा : नागराळ इंडिया प्रायवेट लिमीटेड, नांदेड या घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराने कामचुकारी व दिरंगाई केल्याने परंडा नगर परिषद मुख्याधिकारी यांनी झालेले कंत्राट रद्द केले आहे. (The contract of Nagral India Company, which manages solid waste in Paranda city, has been cancelled)
स्वच्छता सारख्या अत्यावश्यक सेवेच्या बाबतीत पूर्णतः हलगर्जीपणा, बेजबाबदारपणे कामकाज केल्याचे निदर्शनास येते, तरी आपणास देण्यात आलेले कंत्राट दंड लावून व अनामत रक्कम जप्त करून तात्काळ प्रभावाने दि. २०/०५/२०२३ पासून रद्द करण्यात येत आहे . (Paranda News) अशी नोटीस मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी नागराळ इंडिया प्रा .लि. यांना शुक्रवार ( दि .१९ ) बजावली आहे.
परंतू महिनाभरा पासून घंटा गाड्या बंद असल्याने घरादारात , रस्ता कचरा साठला आहे. याचे नियोजन कसे होणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कामचुकारी व दिरंगाई केल्याप्रकरणी कारवाई
बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे कि, घनकचरा व्यवस्थापन २०१६ अंतर्गत घर ते घर कचरा संकलन, वाहतूक, कचऱ्याचे वर्गीकरण, रस्त्याचे झाडकाम, गटार/नाली साफसफाई, कचऱ्यावर शास्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे, खत निर्मिती तसेच मैला व्यवस्थापन करणे व इतर आनुषंगिक कामाबाबत नागराळ इंडिया प्रायवेट लिमीटेड, नांदेड यांना दि .३१/१०/२०२२ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. हा आदेश दि . ०१/११/२०२२ ते ३१/०७/२०२३ या कालावधी करिता होता.(Paranda News)
नगर परिषदेने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार घर ते घर कचरा गोळा करणे त्याची वाहतूक करणे. (Paranda News) रस्ता स्वच्छता करणे आणि त्यातून निघालेल्या कचऱ्याची वाहतूक करणे, नाली/गटार स्वच्छता करणे व त्यातून निघालेल्या गाळमिश्रित कचरा वाहतूक करणे, घनकचर्यावर प्रक्रिया करणे, मैला व्यवस्थापन केंद्र चालविणे या कामाकरिता कंत्राट देण्यात आले होते.
वेळोवेळी नोटीसा देऊन शहर स्वच्छता करणे शहरामध्ये घंटागाडी दररोजच्या दररोज शहरातील प्रत्येक भागामध्ये फिरविणे व कचरा संकलन करणे, सदर कचऱ्यावरती प्रक्रिया करून खत निर्मिती करणे, सक्शन मशीन चालविणे बाबत कळविण्यात आले होते. परंतु शहरातील विविध भागातून नागरिकांच्या तक्रारी नगर परिषद कार्यालयास लेखी स्वरुपात तसेच दूरध्वनी व सोशल मिडीया याद्वारे प्राप्त झालेल्या आहेत.(Paranda News)
त्यानुसार दि .०२ /०३ /२०२३ रोजी मुख्याधिकारी व न.प. कर्मचारी यांनी शहरास प्रत्यक्ष भेट दिली असता शहरामध्ये सर्व ठिकाणी अस्वच्छता दिसून आली. (Paranda News) तसेच घंटागाडी फिरत नसल्याबाबत, घंटागाडी बंद असल्याबाबत दिसून आले होते. त्यासंबंधी आपणास नोटीस देऊन सुधारणा करण्याबाबत कळविले होते. तसेच या संदर्भात नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या ई निविदेतील व करारनाम्यातील अट क्र. ७४ नुसार सदर काम बंद राहिल्यास प्रतिदिन १,००,०००/- पर्यंत दंड करण्याची तरतूद नमूद आहे.
त्यानुसार आपले काम हे प्रत्येक महिन्यामध्ये ४-५ दिवस पूर्णपणे बंद असल्याचे दिसून येते. काम चालू असल्यास पूर्ण क्षमतेने चालू नसल्याचे आढळून आले आहे जसे के अंदाजपत्रकानुसार ०५ घंटागाडी दररोज कचरा संकलनासाठी शहरामध्ये फिरविणे आवश्यक असताना ०१ घंटागाडी फिरविणे प्रत्येक गल्ली मध्ये घंटागाडी न फिरविणे, नाली सफाई न करणे, रस्ते स्वच्छता न करणे तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरील प्रक्रिया पूर्णपणे बंद असणे हे प्रकार ठेका दिलेल्या पहिल्या दिवसापासून चालू आहेत.(Paranda News)
वरील सर्व तक्रारीची दखल घेत दिनांक १८/०५/२०२३ रोजी दुपारी ०४.०० ते ०६.०० च्या दरम्यान मुख्याधिकारी कार्यालयीन अधीक्षक, लेखापाल, स्वच्छता निरीक्षक, शहर समन्वयक, स्वच्छता दफेदार यांच्या प्रत्यक्ष शहर व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे भेट दिली असता शहरामध्ये एक हि सफाई कामगार स्वच्छता करत असल्याचे निदर्शनास आले नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरती कचऱ्यावर प्रक्रिया करणे पूर्णतः बंद असल्याचे दिसून आले.(Paranda News)
शहरातील घंटागाड्या दि. ०१/०५/२०२३ पासून बंद असल्याचे दिसून येते. तसेच कधीतरी एक घंटागाडी फिरविल्याचे दिसून आले आहे. आपणाकडून लावण्यात आलेल्या घंटागाड्या या घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये घालून दिलेल्या नियमानुसार नसून, फिरते ०३ व चार चाकी भाडेकरू वाहन लावण्यात आलेले आहेत व नियमानुसार ते कोणत्याही बंदिस्त स्वरुपात असल्याचे आढळून आले नाही.(Paranda News)
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ची पूर्वतयारी तसेच शहराचे स्टार मानांकन यावरती परिणाम होऊन शहराचा दर्जावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. (Paranda News) मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व कामे होणे आवश्यक असते. परंतु सदरील कामे न झाल्यामुळे शहरातील नाल्या तुंबून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशाचे पालन होत नसल्याने नगर परीषेदे विरुध्द एमपीसीबी मार्फत कार्यवाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Paranda News) आपले काम पूर्णतः असमाधानकारक असल्याचे दिसून येते, तसेच आपण स्वच्छता सारख्या अत्यावश्यक सेवेच्या बाबतीत पूर्णतः हलगर्जीपणा, बेजबाबदारपणे कामकाज केल्याचे निदर्शनास येते, तरी आपणास देण्यात आलेले कंत्राट दंड लावून व अनामत रक्कम जप्त करून तात्काळ प्रभावाने दि. २०/०५/२०२३ पासून रद्द करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Paranda News : तांदुळवाडी ते देऊळगांव रस्त्यावरील पुलाचे काम करण्याची मनसेची मागणी