नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी iQOO ने आपला नवा iQOO 13 5G हा स्मार्टफोन भारतात नुकताच लाँच केला. हा फोन लाँच होताच या फोनने बाजारात मोठी चर्चा निर्माण केली आहे. या फोनला यूजर्सकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: लोकांना त्याचे रिअल टाईम भाषांतर आणि कॅमेऱ्यातील एआय फीचर आवडल्याचे दिसत आहे.
जर तुम्ही हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल, परंतु त्याची किंमत जास्त असल्याने तो खरेदी करू शकत नसाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. Amazon ने या फोनवर एक भन्नाट डील आणली आहे. त्याच्या मदतीने तुम्ही हा फोन 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. हा फोन Amazon वर 54,999 रुपयांना मिळत आहे. iQOO 13 मध्ये 6.82 इंच AMOLED डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमधील क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट सुपरकॉम्प्युटिंग चिप 2 सह जोडलेला आहे.
iQOO 13 5G फोनवर 2000 रुपयांची बँक ऑफर मिळत आहे. त्यानंतर त्याची किंमत 52,999 रुपये होणार आहे. याशिवाय Amazon या फोनवर 27,350 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यानंतर फोनची किंमत 25,649 रुपये होईल. पण, एक्सचेंज ऑफरमध्ये, तुमच्या जुन्या फोनची किंमत त्याची स्थिती आणि मॉडेलच्या आधारावर ठरवली जाईल. त्यामुळे एक्सचेंज ऑफरमध्ये तुमच्या जुन्या फोनची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.