मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वेगळ्या कारणावरून सतत वाद झाल्याचे पाहायला मिळतं आहेत.अनेकदा दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करतानाही दिसतात. आता पुन्हा एकदा डोंबिवलीतील सुनिलनगरमध्ये कवित्री बहिणाबाई चौधरी गार्डनमध्ये तयार करण्यात येणाऱ्या वाचनालयावरून शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार घमासान सुरू आहे. आता या वाचनालयावरून डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
डोंबिवली पूर्वेतील सुनिलनगरमध्ये गार्डन आहे. या गार्डनमध्ये लहान मुले,महिला वयोवृद्ध येतात. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून या गार्डनमध्ये वाचनालय उभारल जाणार आहे. मात्र या वाचनालयाला ठाकरे गटाने तीव्र विरोध दर्शवला आहे. लहान मुलांसाठी असलेल्या या बगिच्यात वाचनालय झाले तर लहान मुले काय करतील? आम्ही अजिबात वाचनालय होऊ देणार नाही. याला स्थानिक नागरीकांचा प्रचंड विरोध आहे. अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे. तर शिंदे गटाने हे वाचनालय निश्चितपणे होणार असल्याचा दावा केला आहे.त्यामुळे या वाचनालयावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार जुपलीं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील यांनी आम्ही नागरीकांना विचारुन हा प्रस्ताव केला आहे. २५ लाखातून सुसज्ज असे गार्डन तयार होणार आहे. त्यात अत्याधुनिक सर्व सोयी सुविधा असणार आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे. होणारे वाचनालय हे अधिकृत आहे काही लोकांच्या पोटात दुखत आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला.गार्डनच्या परिसरात अनधिकृत बॅनर बाजी सुरु आहे. त्यावर का बोलत नाही.आत्ता या मुद्यावर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु आहे.