The Archies : नवी दिल्ली: द आर्चीज रीलीज झाल्यानंतर त्याचे रिव्ह्यू समोर येत आहेत. बॉलिवूडमध्ये अनेकदा स्टार किड्स लाँच केले जातात. मात्र, द आर्चीजमधून सुहाना, खुशी, अगस्त्य OTT, Netflix माध्यामातून लाँच झाले. ज्याद्वारे तीन स्टार किड्स एकत्र लॉन्च केले. त्याप्रमाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील असं वाटत होते. मात्र, तस काही झालं नाही. गली बॉय आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा सारखे चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शिका झोया अख्तरने यांना लॉन्च केले. मात्र, द आर्चीज रीलीज झाल्यानंतर समोर येणाऱ्या रिव्ह्यूने प्रेक्षकांच्या अपेक्षांना धूळ चारली आहे.
“द आर्चीजच्या कथेला फारसा अर्थ नाही.असे काहींचे म्हणणे आहे. यात तीन स्टार्स आहेत आणि तिघेही तीन मोठ्या चित्रपट घराण्यातील आहेत. ही एकच गोष्ट संपूर्ण चित्रपटावर अधिराज्य गाजवते. मात्र, दिग्दर्शक झोया अख्तरनेही कथेवर लक्ष केंद्रित केले नाही. त्याने कॉमिक्सचे जग तयार करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वकाही अतिशय विलक्षण ठेवले. कथा ग्रीन पार्क आणि लव्ह ट्रँगल यांच्यात फिरताना दिसते”, असे अनेकांचे म्हणणे आहे.
“द आर्चीजच्या माध्यमातून तीनही स्टार किड्स काम काही चांगले करत असल्याचे दिसत नाहीत. झोया यात ना चांगली कथा आणू शकली, ना चांगले दिग्दर्शन आणि ना तिला अभिनय करायला लावू शकली. झोया अख्तरकडून खूप अपेक्षा होत्या, पण तिने प्रत्येक आघाडीवर निराशा केली आहे. ‘द आर्चिज’ चित्रपटाची दिशा खूपच वाईट आहे. चित्रपटात नवीन काही येत नाही”.
“‘द आर्चीज’मध्ये स्टार किड्स आहेत. सुहाना खान आणि खुशी कपूर चित्रपटात अभिनयाच्या नावाखाली ती काय करतेय हे समजण्यापलीकडचे आहे. ते ज्या प्रकारचे एक्सप्रेशन देत आहेत ते संवादांशी जुळत नाहीत आणि या स्टार किड्सना अभिनयाची एबीसीडीही माहीत नाही हे स्पष्ट आहे”, असे काहींचे म्हणणे आहे.