राहुलकुमार अवचट
यवत : पोलिस स्टेशन शेजारीच सेवामार्गावर असलेल्या वृक्षाचा अडथळा निर्माण होत असल्याने वाहतूक कोंडी ही कायमचीच समस्या निर्माण झाली होती अखेर अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रशासनाने याबाबतीत प्रशासनाने वृक्ष काढण्याचा निर्णय घेतला.
सेवा मार्गावरच असलेल्या यावृक्षांमुळे पोलीस स्टेशन परिसरात कायमच वाहतूक कोंडी निर्माण होत असत जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा, बस थांबा, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय, पी डी सी बँक, पेट्रोल पंप जवळच असल्याने या परिसरात सतत नागरिकांची वर्दळ असते.
अनेक वर्षापासुन सेवा मार्गातील हे झाडे काढण्यासाठी नागरिक मागणी करत होते अखेर वाहतूक कोंडीचा अडथळा ठरत असलेले वृक्ष प्रशासनाने काढले असुन यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतुन नागरिकांची सुटका होईल अशी भावना नागरिकांमध्ये असली तरी पोलिस स्टेशन ते तुकाई मंदिर दरम्यान व दोन्ही बाजुने सेवामार्गावर बेशिस्तपणे वाहने उभे करणाऱ्यांवर कारवाई करुन सेवामार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे