अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव गणपतीजवळ हॉटेल अमरीन समोर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील दोघे अहिल्यानगर मार्गाने पुण्याकडे जात असताना आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे.
अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असुन रांजणगाव एम आय डीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास रांजणगाव एम आयडीसी पोलीस स्टेशन करत आहे.







