लोणी काळभोर: लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे ”शासन आपल्या दारी” हा शासकीय समाजोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. लहुजी शक्ती सेना, भगवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी स्थळावर सर्वात प्रथम लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच चितरंजन गायकवाड व महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच नाशिर पठाण, ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे, नितीन लोखंडे, रुपाली काळभोर, स्मिता लोंढे, वैशाली सकट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अभिजीत पचकुडवे, लहुजी शक्ती सेनेचे आकाश मात्रे, रोहन सपकाळ, सुहास काळभोर,शब्बीर पठाण, अमर सोनवणे, सुजल शेंडगे, सागर भाले, मयूर सकट, कमलेश सकट, किरण मात्रे, वर्षा भिसे, शोभा सकट, निर्मला चांदणे आरती मोरे, सविता मोरे, शिल्पा मात्रे,शुभांगी शिंदे, सीमा अडागळे, सुवर्ण मात्रे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना चितरंजन गायकवाड म्हणाले, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती व महापुरुषांच्या विचारांची जयंती ही आज या ठिकाणी लोकोपयोगी कार्यक्रम ‘शासन आपल्या दारी’ राबवून साजरी होत आहे. खऱ्या अर्थाने आज ही अण्णाभाऊ साठे यांची जयंती सार्थकी झाली आहे आणि हेच खरे त्यांना अभिवादन आहे.
दरम्यान, या कार्यक्रमामध्ये आधार कार्ड संबंधित सर्व कामे, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांच्या संदर्भात विधवा वृद्ध महिलांना कागदपत्रांबद्दल माहिती देण्यात आली. पुरवठा विभाग अंतर्गत रेशनिंग कार्डची समस्या सोडवण्यासाठी 200 ते 250 अर्ज घेण्यात आले. या कार्यक्रमात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोडके व दीपक काळभोर यांनी केले.







