Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 9 June 2026, 22:59

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी ओमानच्या सहकार्याने नवीन गॅस पाइपलाइन प्रकल्प पुढे नेण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पांतर्गत ओमान ते गुजरात दरम्यान सुमारे 2000 किलोमीटर लांबीची समुद्राखालून गॅस पाइपलाइन उभारण्याचा प्रस्ताव आहे.

या पाइपलाइनद्वारे ओमानमधील नैसर्गिक वायू थेट भारताच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत पोहोचविण्याची योजना आहे. यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीवरील अवलंबित्व कमी होऊन ऊर्जा पुरवठ्यासाठी पर्यायी आणि अधिक सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे.

हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र मोठा खर्च, तांत्रिक आव्हाने आणि व्यवहार्यतेबाबतचे प्रश्न यामुळे तो प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता. आता बदलत्या जागतिक परिस्थितीत या प्रकल्पाकडे पुन्हा गांभीर्याने पाहिले जात आहे.

 

या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी सुमारे 40,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावित मार्गाचा काही भाग समुद्रसपाटीपासून 3000 मीटरपेक्षा अधिक खोलीवरून जाणार असल्याने हा जगातील सर्वात खोल सागरी गॅस पाइपलाइन प्रकल्पांपैकी एक ठरू शकतो.

भारत आपल्या ऊर्जा गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. विशेषतः नैसर्गिक वायू आणि एलएनजीचा मोठा हिस्सा आखाती देशांतून होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येतो. या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास इंधनाच्या किमती, वाहतूक खर्च आणि पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यायी मार्ग उभारणे भारतासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

या प्रकल्पासंदर्भात सविस्तर व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे काम केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील काही प्रमुख ऊर्जा कंपन्यांकडे सोपवले आहे. अहवाल पूर्ण झाल्यानंतर भारत आणि ओमान यांच्यात पुरवठा, वित्तपुरवठा आणि अंमलबजावणीबाबत पुढील चर्चा होण्याची शक्यता आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यास भारताला ऊर्जा पुरवठ्याचा अधिक सुरक्षित पर्याय मिळेल, तर ओमानलाही दीर्घकालीन आणि स्थिर निर्यात बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच नैसर्गिक वायू थेट पाइपलाइनद्वारे पोहोचणार असल्याने वाहतूक प्रक्रियाही अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26

‘हे माझ्यासाठी मोठं दायित्व’ ; शिक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रल्हाद जोशीचीं प्रतिक्रिया चर्चेत

Sunday, 26 July 2026, 7:57

पुन्हा पावसाचा रौद्रावतार! 26 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा, ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 26 July 2026, 7:34

रविवारचा सुवर्णयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 26 July 2026, 7:19

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36
Next Post

High RTP Slots en Instant Wins bij Lotto Casino voor België

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.