मुंबई : सीमाप्रश्नावरून सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी शह – काटशहच्या खेळी सुरु केल्या आहेत. कर्नाटक सरकारने दुष्काळग्रस्त जत तालुक्यात पाणी सोडत महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न सुरु केला आणि पुन्हा एकदा राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.
कर्नाटकला जशास तसे उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत तालुक्यातील पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी तब्बल दोन हजार कोटींचे टेंडर काढण्याची घोषणा केली आहे.
काल रात्री दीडच्या सुमारास जत येथील ग्रामस्थ आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी नकाशावरील काही गोष्टी येथील ग्रामस्थांना दाखविताना पाणी प्रश्नासाठी २ हजार कोटींचे टेंडर काढणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे जत तालुक्यातील गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकालात निघण्याची शक्यता आहे. साधारण नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात हे टेंडर लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“म्हैसाळ योजनेची व्याप्ती वाढवण्याचे काम सुरु असून जतमधील जे ४०-५० पाणी मिळण्यासाठी हे सुरु आहे. या विषयावर बाकीच्या लोकांना राजकारण करायचं आहे, त्यांनी राजकारण करावे.
आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटक सरकारला चिमटा काढला.