जुन्नरः जुन्नर तालुक्यातील बिबट्यांच्या हल्ल्याची समस्या अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्यामुळे जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले १० बिबट प्राणी जामनगर (गुजरात) येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील ‘वनतारा प्राणीसंग्रहालया’त जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून ४ मादी व ६ नर असे एकूण १० बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरण यांनी मान्यता दिल्ली यानी मान्यता दिली होती. त्यांना अॅम्ब्युलन्समधून नेण्यात येत असून एक रुग्णवाहिका अतितातडीच्या मदतीसाठी सोबत असणार आहे. जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे या तीन रुग्णवाहिका दाखल होईपर्यंत सोबत गुजरात येथील झु मॅनेजर, पद्यकीय अधिकारी व २३ मॅनेजमेंट टीमचे सदस्य असणार आहेत.