पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलला आग लागली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीमुळे चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी- चिंचवडच्या हिंजवडी परिसरातील फेज वन मध्ये टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागली. आत मध्ये बसलेल्या चार प्रवासांचा होरपळून मृत्यू झालाआहे. तर इतर जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी पैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे.बस मध्ये एकूण बारा कामगार होते.आगीने मृत्यूमुखी पडलेले कर्मचारी हे योमो ग्राफीक्स कंपनीचे कर्मचारी होते अशी माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तसेच त्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत पोलिसाकडून या घटनेची नोंद करण्यात आली आहे.