Telangana Election Result 2023: हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबरला मतदान झाले. आज त्याचा निकाल लागत आहे. गेल्या १० वर्शापासून सत्तेत असलेल्या बीआरएस पक्षाला चांगलाच हादरा बसला आहे. बीआरसला पराभूत करत काँग्रेसने तेलंगणात एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली आहे. मात्र या सर्वात मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचार केलेल्या भाजपाच्या २ उमेदवारांचे काय झाले याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार पायल शंकर आणि एस. कुमार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः मैदानात उतरले होते.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा प्रचार केला होता. यावेळी त्यांनी मदरांसोबत संवाद साधला होता. पायल शंकर हे आदिलाबाद येथून तर एस. कुमार हे धर्मपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. मात्र यातील पायल शंकर यांना यश चांगले यश मिळाले आहे. तर एस. कुमार यांचा पराभव झाला आहे.
आदिलाबाद मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या पायल शंकर यांनी भारत राष्ट्र समितीच्या जोगु रमन्ना यांचा पराभव केला आहे. तर काँग्रेसच्या कंदी श्रीनिवास रेड्डी यांना तिसऱ्या जागेवर समाधान मानावं लागलं आहे. आदिलाबाद मतदारसंघात मुख्य लढत ही पायल शंकर आणि बीआरएसच्या जोगु रमन्ना यांच्यातच होती. पायल यांचा 66,468 मतांनी विजय झाला आहे. तर जोगु रमन्ना यांना 60,321 मते मिळाली आहेत.