मुंबई: टेक्नोकडून या डिसेंबरमध्ये बजेटमधले फोल्डेबल स्मार्टफोन लॉच करणार आहे. टेक्नो फँटम फ्लिप व्ही २ आणि फँटम फोल्ड व्ही २ हे दोन फोनचे मॉडेल बाजारात आले आहेत. टेक्नो फॅटम फ्लिप व्ही २ फोनमध्ये ७.८५ इंच डिस्प्लेचा समावेश आहे. तर कव्हर डिस्प्ले ६.४५ इंच आहे. यात एलटीपीओ अॅमोलेड पॅनल देण्यात आला आहे. यात १२ जीबी रॅमसह ५१२ जीबी स्टोरेज मिळते. फोनमध्ये ५० एमपीचा प्रायमरी, २० एक्स ऑप्टिकल आणि २० एक्स डिजिटल झूम लेन्ससह ५० मेगापिक्सलचा पोर्ट्रेट आणि ५० एमपीचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. तसेच, सेल्फीसाठी दोन ३२ एमपीचे कॅमेरे आहेत. यात ५,७५० एमएएचची बॅटरी असून ७० वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो.
टेक्नो फँटम व्ही फ्लिप २ मध्ये मागील बाजूस ३.६४ इंचाचा पॅनल देण्यात आला आहे. तसेच फोनचा प्रायमरी डिस्प्ले ६.९ इंचाचा एलटीपीओ अॅमोलेड पॅनल आहे. हा मोबाइल ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये ५० एमपीचा प्रायमरी, ५० एमपीचा अल्ट्रावाइड कॅमेरा तसेच, फ्रंटला ३२ एमपीचा कॅमेरा मिळतो. यात ४,७२० एमएएच बॅटरी ती ७० वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट असून करते. या दोन्ही फोल्डेबल फोन्स १३ डिसेंबरपासून अॅमेझॉनच्या माध्यमातून मिळेल. सध्याची किंमत तात्पुरती असून नंतर त्यात वाढ होणार आहे.