IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाने एडिलेडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट्स राखून भारतावर दणदणीत विजय मिळवत बॉर्डर-गावस्कर स्पर्धेतील पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. अशातच आता उर्वरित तिन्ही सामने टीम इंडियासाठी करो या मरो असे असणार आहेत. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. अशातच आता गाबा टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने ब्रिस्बेनमध्ये भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या तिसऱ्या कसोटीसाठी महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीतून परतणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची त्रिकुट पुन्हा मैदानात दिसणार आहे. पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्यासमोर टीम इंडियाचं आव्हान असणार आहे.
उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्वीनी नेहमीप्रमाणे सलामीला येणार तर मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यावर मिडल ऑर्डर सांभाळण्याची जबाबदारी असणार आहे. तसेच मिचल मार्श आणि ॲलेक्स कॅरी यांच्यावर देखील मोठी जबाबदारी असेल. तसेच ऑस्ट्रेलियाने नॅथन लायन या स्पिनरला संघात जागा दिलीय आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया इलेव्हन : उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ॲलेक्स कॅरी (WK), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, नॅथन लायन.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, अभिमन्यु ईश्वरन, शुबमन गिल, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर),सर्फराज खान, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, वॉशिंगटन सुंदर आणि नीतीश कुमार रेड्डी.