नवी दिल्ली : सध्या अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन उत्पादने बाजारात आणत आहेत. त्यात आता आघाडीची कंपनी अशी ओळख असलेल्या टाटा मोटर्सने कार उत्पादनात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. टाटा मोटर्सने भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीला सानंद, गुजरात येथील त्यांच्या अत्याधुनिक प्लांटमधून 10 लाख कार उत्पादनाचा टप्पा गाठला.
टाटा मोटर्सचे सर्वांत नवीन प्लांट असलेल्या सानंद प्लांटमध्ये असलेल्या सर्व प्रक्रियांमध्ये अप-टू-द-मिनट तंत्रज्ञान आहे. या उच्च मेकॅनाइज्ड प्लांटमध्ये सर्वोत्तम प्रक्रिया व्यवस्थापन सिस्टिम आहे. प्लांटमध्ये प्रेस लाईन, विल्ड शॉप, पेंट शॉप, असेम्ब्ली लाईन आणि पॉवरट्रेन शॉप आहे. या प्लांटमध्ये स्थिर असेम्ब्ली लाईन आहे आणि प्रवासी वाहनांचे विविध मॉडेल्स उत्पादित करण्यासाठी ओळखले जाते. यात टियागो, टियागो एएमटी, टियागो, ईव्ही, टियागो आयसीएनजी, टिगोर, टिगोर एएमटी, टिगोर ईव्ही, टिगोर आयसीएनजी आणि एक्स्प्रेस-टी ईव्ही सिंगल मॉडेल प्लांटचा समावेश आहे.
2010 मध्ये 1100 एकर जागेवर सानंद प्लांटची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये 741 एकर जागेवर टीएमएल आणि 359 एकर जागेवर वेंडर पार्क आहे. तसेच 6000 हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्मचारी आहेत. हे प्लांट टाटा मोटर्सच्या विकास व यशामध्ये साह्यभूत राहिले आहे. अशातच आता टाटा प्लांटने गुजरात येथील त्यांच्या अत्याधुनिक प्लांटमधून 10 लाख कार उत्पादनाचा टप्पा गाठला आहे.