अक्षय भोरडे
Talegaon News : तळेगाव ढमढेरे निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने अत्यंत खडतर व धोकादायक मार्ग असणारी तब्बल चोपन्न किलोमीटर अंतराची पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम नुकतीच यशस्वीपणे पार पाडली आहे. या पदभ्रंमती मोहिमेत शिरुर तालुक्यातील ९० पेक्षा जास्त गडकिल्ले प्रेमी सहभागी झाले होते. (Talegaon News)
९० पेक्षा जास्त गडकिल्ले प्रेमी सहभागी
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने दर महिन्याला एक याप्रमाणे गडकिल्ले मोहीम राबवली जात असते. यावेळी त्यांनी पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम यशस्वी केली आहे. या मोहिमेतून हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी अनेक शूरवीर मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. (Talegaon News)
यांमध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे व सोबतच्या तीनशे मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर जाईपर्यंत घोडखिंडीमध्ये बलाढ्य शत्रुशी दिलेली कडवी झुंज व मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या पावनखिंडीचा इतिहास जवळुन पाहता यावा हा पदभ्रंमतीचा उद्देश होता. (Talegaon News)
अत्यंत खडतर व धोकादायक मार्ग असणाऱ्या चोपन्न किलोमीटरच्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीमेत शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, रांजणगाव, निमगाव म्हाळुंगी, टाकळी भीमा, खंडाळे, कारेगाव, मलठण तसेच हवेली तालुक्यातील वाघोली, अष्टापुर सह आदी परिसरातील तेरा ते साठ वर्षे वयोगातील पुरुष व महिला सदस्य असे नव्वद पेक्षा अधिकजण सहभागी झाले होते. (Talegaon News)
सदर गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान पदभ्रंमती मोहिमेचे आयोजक रविंद्र काळे, शरद काळे, पंकज माने, आयुब शेख, विजय माने, विठ्ठल वडघुले, गणेश घोरपडे, वैभव करपे, मुरलीधर कटके, रविंद्र मोरे, अक्षय कांबळे, संतोष लांडे, निलेश काळे, गोरक्ष पाचुंदकर, वैभव नरवडे यांसह आदी सदस्यांनी केले होते. (Talegaon News)
दरम्यान, गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने दर महिन्याला एक याप्रमाणे या मोहीमेचे आयोजन केले जाते. आजपर्यंत महाराष्ट्रातील कठीण श्रेणीतील मोरोशीचा भैरवगड, पदरगड, सिद्धगड तसेच जेष्ठ व बालकांना प्रोत्साहन म्हणून पेठचा कोथळीगड, हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा अशा एकूण सेहेचाळीस ट्रेकचे यशस्वी केले आहे (Talegaon News)