Health News : पुणे : पावसाळा संपला की थंडीची चाहूल सुरु होते. त्यानुसार, आरोग्याची विशेष काळजी देखील घ्यावी लागते. पण हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. कारण या ऋतूमध्ये कित्येक प्रकारच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारामध्ये अख्खे कडधान्य यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा लागतो.
तापमानात घट झाल्यानं सर्दी-खोकला, ताप, त्वचेशी संबंधित विकार इत्यादी त्रास निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित ठेवणे आवश्यक आहे. हिवाळ्यात फिट आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी आहारापासून ते व्यायामापर्यंत सर्व गोष्टींची योग्य ती काळजी घ्यायला हवी. फळ आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या पोषक घटकांचा शरीराला पुरवठा झाल्यास आजारांविरोधात लढण्यात मदत मिळते.
थंडीमध्ये तेलकट, तिखट खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळावे. हे पदार्थ आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात. थंडीच्या दिवसांत शरीराची हालचाल देखील कमी प्रमाणात होते. हिवाळ्यामध्ये अधिक प्रमाणात भाज्या आणि फळांचं सेवन करावे. त्याने आरोग्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो.