लहू चव्हाण
Table Land Point : पाचगणी, (सातारा) : पर्यटन नगरी पाचगणी येथील सुप्रसिध्द टेबल लॅंन्ड पठारावर दारू व गांजा सेवन करुण पर्यटकांकडून अवाच्या सवा पैसे उकळणाऱ्या इसमांविरुध्द कठोर कारवाई यावी. यासंदर्भात टेबल लॅंन्ड स्टॉल मालक संघटनेचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना संघटनेबाबत निवेदन देण्यात आले आहे. Table Land Point
दिलेल्या निवेदनानुसार, टेबल लॅन्ड पॉइट पांचगणी महाबळेश्वर येथील सर्वात मोठे पर्यटन स्थळ आहे व पांचगणीकरांचे नाक आहे व आम्ही स्टॉल धारक हे टेबल लॅन्ड वर येणाऱ्या पर्यटकांच्या वर आम्हा सर्वांचा उदरनिर्वाह होत आहे परंतु घोडे, टांगे १३ जुन ते १३ सप्टेंबर कालावधीमध्ये बंद असतात परंतु गाईड करणारे इसम हे टेबल लॅन्डवर दारू व गांजा सेवन करुण पर्यटकाकडून अवाच्या सवा पैसे उखळत आहेत. व पर्यटकांना उर्मट पध्दतीचे वागणूक देत आहेत Table Land Point
आम्ही त्यांना समजावून सांगीतले की तूम्ही गाईड करु नका त्यानी आमचे ऐकले नाही व सर्व इसम गाईड करणारे स्थानीक व बाहेरील आहे तरी ह्या ठिकाणी पर्यटकांच्या सोबत अनुसुचीत प्रकार पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. व त्याचा परिणाम आम्हा व्यवसाईकांवर होणार असून टेबल लॅन्ड पॉईटचे नाव खराब होण्याची दाट शक्याता निर्माण झाली आहे.
दरम्यान, संबंधित इसम दररोज रात्र भर दारु व गांजा पितात व कोणी विचारले की आम्ही दूकानदार आहोत असे सांगीतले जाते. परंतु ते दुकान दार नाहीत. आम्ही या निवेदनाद्वारे आपणास कळवितो की, आपण सदर इसमांवर वेळीच कारवाई न केल्यास पांचगणी शहराचे व टेबल लॅन्डच्या नावाला डाग लागेल. आपण या निवेदनाचा गांभिर्याने विचार करावा व योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे.