मुंबई: T20 World Cup 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून त्यांची पाच गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघाला ‘अ’ गटात ठेवण्यात आले असून त्यात पाकिस्तानही आहे. एकाच गटात भारत आणि पाकिस्तानचे संघ साखळी फेरीत आमनेसामने येतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ग्रुप स्टेजचा सामना 09 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.
1 जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना 05 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. यानंतर भारताचा दुसरा सामना 09 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया लीग स्टेजमध्ये 12 जूनला अमेरिकेविरुद्ध आणि 15 जूनला कॅनडाविरुद्ध खेळेल. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेचे संघ अ गटात आहेत.
T20 विश्वचषकात टीम इंडियाचे लीग स्टेजचे सामने
5 जून रोजी भारत विरुद्ध आयर्लंड
9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान
12 जून रोजी भारत विरुद्ध अमेरिका
15 जून रोजी भारत विरुद्ध कॅनडा.