पुणे प्राईम न्यूज डेस्क: मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस आणि चॉकलेट हिरो अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्नील जोशी याचा बेधडक डॅशिंग अंदाज लवकरच पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर स्वप्नील आता आगामी ‘जिलबी’ या मराठी चित्रपटात विजय करमरकर या डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
आनंद पंडित मोशन पिक्चर्सनिर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे. आपल्या भूमिकेबद्दल स्वप्नील सांगतो की, आपला पोलिसी खाक्या दाखवत चोख कामगिरी बजावणारा हा पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे.