बापू मुळीक / सासवड : रिसे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतच्या सरपंच रूपाली सुरेश गायकवाड व उपसरपंच सुवर्णा संजय बोरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी फक्त अदलाबदल करून सरपंचपदी सुवर्णा संजय बोरकर तर उपसरपंचपदी रुपाली सुरेश गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंडलाधिकारी राजाराम भामे, तलाठी सागर कुचेकर व निवडणूक सहाय्यक गामसेविका निलिमा चांदगुडे (धायगुडे) यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश पिसाळ, सुप्रिया चव्हाण, रविंद्र कामठे, विद्या चव्हाण, ऊमेश कांबळे, माजी सरपंच विश्वास आंबोले, निरा कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक सुशांत कांबळे, विलास शेडगे गावातील आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष आदी उपस्थित होते. रिसे खोपडेवाडी, हांडेवसती, गावातील प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिकांना पाणी, आरोग्य, महिलाच्या अडचणी या महत्त्वाच्या गोष्टी शेतकरी, सर्वसामान्यांच्या अडचणी या माझ्या कार्यकाळामध्ये पूर्ण करणार असल्याचे नूतन सरपंच सुवर्णा बोरकर यांनी यावेळी सांगितले.