योगेश मारणे
शिरूर : अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत दाणेवाडी (ता.श्रीगोंदा,जि.अ.नगर)येथे क्रौर्य कृत्याची परिसीमा ओलांडून अतिशय विचित्र पद्धतीने खून झालेला मृतदेह बुधवारी(ता.१२)येथील एका विहिरीत आढळून आला होता.त्यामुळे अहिल्यानगर व पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पुढील तपासासाठी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे.
संशयितांमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी व हिंगणी आणि शिरूर तालुक्यातील निमोणे व शिरूर येथील काही संशयितांना संबंधित गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून,त्यांच्याकडून कसून चौकशी सुरु आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती देताना शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले की,माणुसकीला काळीमा फासणारी घटना दाणेवाडी येथे अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर घडली.संबंधित घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीत घडली असल्यामुळे त्या घटनेचा पुढील तपास अहिल्यानगर पोलीस करत असून, पुण्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग त्यांना मदत करत आहे.त्यामुळे दाणेवाडी(जि.अ.नगर)येथे विहिरीत सापडलेल्या विचित्र मृतदेहाची ओळख पटविण्याचे खडतर आव्हान पोलिसांपुढे आहे.तरसंबंधित मृतदेहाचा “डीएनए” अहवाल अद्यापर्यंत प्राप्त झालेला नाही. त्यामुळे पोलिसांकडून मृतदेहाचे इतर गायब असलेले अवयव शोधण्याचे काम सुरू आहे.परंतु,”तो” मृतदेह नक्की कोणाचा याबाबत पोलिसांपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान ६ मार्च रोजी दाणेवाडी (जि.अ.नगर)येथून एक १९ वर्षीय तरुण गायब झाला होता.त्याची तक्रार शिरूर(जि.पुणे)येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.मात्र,संपूर्ण चौकशी करून झाल्यानंतर तो तरुण युवक शिरूर येथून गायब झाला नसल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.त्यामुळे संबंधित आरोपीला पकडण्याचे व मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
या क्रूर खून प्रकरणातील गुंतागुंत वाढत चालली असून,अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील गोपाळ समाजाच्या शिष्टमंडळाने दाणेवाडी येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याची आणि येथूनच बेपत्ता असलेल्या युवकाचा शोध पोलीसांनी लवकरात लवकर घेण्याची मागणी निवेदनाद्वारे अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.