लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील सूर्यकांत गवळी यांची अखिल भारतीय रविदासीया धर्म संघटन, भारत
च्या राष्ट्रीय समन्वयक पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
कात्रज येथे पार पडलेल्या बुधवारी (ता. १३) गुरु पौर्णिमा दिवशी जागतिक तिसरे धर्मस्थान, बैठकीत पिठाधिश १०८ संत प. पु. श्री. निरंजनदासजी महाराज, डेरा सचखंड बल्ला, जालंधर, पंजाब यांच्या कृपेने प.पु.श्री. सुखदेवजी महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय रविदासीया धर्म संघटन भारत यांच्या उपस्थितीत तसेच संजय खामकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अ. भा.रविदासीया धर्म संघटन, दिनेश देवरे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी, अमोलजी तसेच ग्राहक चळवळीचे ज्येष्ठ दिलीप भोसले यांच्या समवेत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.