Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुप्रिया सुळेंचे सुनेत्रा पवारांसाठी मतदानाचे आवाहन ; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याची साद, शारदा’ प्रांगणातील सांगता सभेत सुळे भावूक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 21 April 2026, 18:10

बारामती, ता. 21 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता मंगळवारी शारदा प्रांगणात एका ऐतिहासिक आणि भावूक वातावरणात पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून, बारामतीकरांना त्यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे. “अजितदादांनी 35 वर्षे बारामतीची सेवा केली, आता त्यांच्या पश्चात वहिनींना साथ द्या,” अशी साद सुळे यांनी घातली.

या सांगता सभेला महायुतीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “शरद पवार यांनी 60 वर्षे आणि त्यानंतर अजित पवारांनी 35 वर्षे बारामतीचा विकास केला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी मनापासून इच्छा होती. मात्र, आता महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सुनेत्रा वहिनींना पूर्ण पाठिंबा देत आहोत. बारामतीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि मतदार त्यांनाच मतदान करेल, याची मला खात्री आहे.”

भाषणादरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताची आठवण सांगताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. “जेव्हा पार्थचा फोन आला की डॅडींचे प्लेन कोसळले आहे, तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. मला ते अपघातग्रस्त विमान पाहण्याचे धाडसही झाले नाही. दादा त्या विमानात नसतील किंवा ते सुखरूप बाहेर येतील, अशी आशा मला वाटत होती,” असे सांगताना त्यांना गदगदून आले होते. अजितदादांची उणीव भासत असताना सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय ही जबाबदारी मोठ्या हिमतीने सांभाळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

बारामतीची शान जपण्याची नैतिक जबाबदारी
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “गेली सहा दशके बारामतीकरांनी शरद पवारांना साथ दिली आहे. आता ही परंपरा आणि बारामतीची शान जपण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.” सर्वात जास्त वेळा निवडून येण्याचा ऐतिहासिक मान यावेळी बारामतीकरांना मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विक्रमी मतदानाचा विश्वास
निवडणूक जाहीर झाली त्याच दिवशी ती बिनविरोध करण्याची मागणी मी केली होती, असे सांगत सुळे यांनी काही उमेदवारांचे अर्ज अद्याप कायम असल्याबद्दल खेद व्यक्त केला. मात्र, तरीही या निवडणुकीत बारामतीकर विक्रमी मतदान करून सुनेत्रा पवारांना विजयी करतील, यात शंका नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

खंडाळा घाटात थरारक अपघात! रस्ता नसताना कार नेली अन् ५० फूट खोल दरीत कोसळली; एका झाडामुळे वाचला जीव

Monday, 3 August 2026, 22:58

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्टीचा पर्दाफाश; तंबाखूजन्य पदार्थ व साहित्याचा मोठा साठा जप्त

Monday, 3 August 2026, 22:30

मामाने सोयरीक मोडल्याने डोकं सटकलं अन् सख्ख्या मामाच्याच बाळाचं अपहरण केलं; रिक्षातच बाळाला सोडून तरुण फरार…

Monday, 3 August 2026, 21:55

यवत पोलिसांची अवैध दारू व्यवसाय विरोधात धडक कारवाई; एकाच दिवशी ६ गुन्हे दाखल, एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Monday, 3 August 2026, 21:08

पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली, भरचौकात उठाबशा काढायला लावल्या पण आता प्रकरण आलं अंगलट! सिनेस्टाइल कारवाई करणं भोवलं

Monday, 3 August 2026, 20:56

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08
Next Post

Lenskart : “लेन्सकार्टच्या ‘ग्रुमिंग गाईड’वरून वाद पेटला!” टिळा-टिकलीवरील कथित निर्बंधांवर मनसे आक्रमक; हवेली तालुक्यात तीव्र निषेध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.