सुरेश घाडगे
परंडा : आठ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या मराठा आरक्षण महामोर्चास ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने शनिवार ( ता. ५ ) पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. येथील शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समन्वय समिती यांना याबाबातचे पत्र देण्यात आले. यावेळी ब्राह्मण महासंघ जिल्हाध्यक्ष रामचंद्र उर्फ विकास कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अध्यक्ष समीर कुलकर्णी, शहरअध्यक्ष मुकुंद देशमुख, आनंद खर्डेकर, राखी देशमुख, राहूल देवळे, अक्षय देशमुख, महेश कुलकर्णी आदि उपस्थित होते.