सुरेश घाडगे
परंडा : उस्मानाबाद पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी शनिवार ( दि. ५ ) सकल मराठा आरक्षण महामोर्चा मार्ग व सभा स्थळ याची पाहणी केली .यावेळी सकल मराठा समन्वय समितीशी संवाद साधला व मोर्चा संबंधी माहिती घेतली. मैदान सभा स्थळ नियोजन पाहून त्यांनी कौतुक केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे, पोलीस उपनिरिक्षक विक्रांत हिंगे आदि उपस्थित होते.