Suicide News बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव येथून मनाला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या लग्नाच्या वाढदिवशीच 30 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचचले हे अद्याप कळू शकले नाही. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दर्शन श्याम लालबिगे ( वय ३० रा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कॉर्ट्स माळेगाव बु, ता. बारामती) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद माळेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी रोहित विजय लालबिगे (रा. दुर्गा टॉकीज समोर, बारामती) फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
दर्शन माळेगावमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) सहायक भंडारपाल या पदावर होता. दर्शने याने सोमवारी दि. २४ पहाटे साडेपाच वाजता कॉर्ट्समधील फॅशनच्या हुकाला कापडाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान,दर्शनच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. त्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मोबाइलवर स्टेटसही ठेवले. आपल्या सहकारी मित्रांना आइस्क्रिम देखील खायला दिले होते. मात्र, लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच दर्शनने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असल्याची माहिती समजली आहे. मात्र दर्शन याने हे टोकाचे पाऊस का उचलले हे अद्याप समोर आले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Baramati Crime | बारामतीत दहा ते बारा भटक्या कुत्र्यांचा दीड वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला