कोणताही दबाव न घेता काम केले, याचे समाधान; साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भावना
Sugar Commissioner News : पुणे : “आव्हानात्मक परिस्थितीतही सामान्य नागरिकांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधत, संवेदनशीलपणे त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या हिताचे निर्णय घेता आले. याच वृत्तीमुळे कोणत्याही पदाचा, कामाचा दबाव राहिला नाही; उलट आनंददायी वातावरणात अनेक चांगली कामे मार्गी लावता आली, याचे समाधान आहे,” अशी भावना राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.
सेवानिवृत्तीनिमित्त सपत्निक सत्कार
भूमाता परिवार, छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब फाउंडेशन आणि शुगरटुडे मॅगेझीनच्या संयुक्त विद्यमाने शेखर गायकवाड (आयएएस) यांच्या शासकीय सेवा निवृत्तीनिमित्त आयोजित ऋणनिर्देश व सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. (Sugar Commissioner News) कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात कृषी महर्षी डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली गायकवाड यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. प्रसंगी गायकवाड यांच्यावरील गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
शेखर गायकवाड म्हणाले, “मला मिळालेल्या प्रत्येक विभागात काम करताना सामान्य नागरिक आणि शेतकरी हा माझ्या कामाचा केंद्रबिंदू राहिला. त्यांच्या नेमक्या अडचणी समजून घेत संवाद व समन्वयाने त्या सोडवल्या. संबंधित विभागाची प्रगती आणि प्रतिमा उंचावेल अशा स्वरूपाचे काम केले. (Sugar Commissioner News) हसत खेळत, सहज कामाचा आनंद घेतला. निरीक्षणातून, घडलेल्या प्रसंगातून लेखन केले. हे लेखन अनेकांसाठी मार्गदर्शक ठरले, याचे समाधान आहे.” आगामी काळात महाराष्ट्र जागतिक पातळीवर साखर उद्योगाचे नेतृत्व करेल, असेही यावेळी शेखर गायकवाड यांनी नमूद केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Manjarri College news : मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयास पीडीसीसी बँकेतर्फे शैक्षणिक अनुदान
Manjari News | मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयास निवडणूक साक्षरता मंडळाचा पुरस्कार…!