Success Story : बीड : परिश्रम करण्याची जिद्द, त्याला अथक प्रयत्नांची जोड अन् घरातल्या आपुलकीच्या माणसांची साथ मिळाल्यास मुली उंचचउंच शिखरे लिलया गाठू शकतात, हेच बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सेलू तांडा येथील ऊसतोड कामगाराच्या तीन मुलींनी दाखवून दिलं आहे. ऊसतोड कामगार मारुती जाधव यांच्या तीनही मुली पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्या आहेत. त्यांच्या या कर्तुत्वाने आई-वडिलांची मान उंचावली आहे. या तिन्ही बहिणींचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.(Success Story)
राज्यात नुकतीच पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडली.
राज्यात नुकतीच पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडली. या वेळी मोठ्या संख्येनं मुली पोलीस दलात रुजू झाल्या. या भरती प्रक्रियेतून सेलू तांडा येथील ऊसतोड कामगार म्हणून काम करणाऱ्या मारुती जाधव यांच्या तीन मुली पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्या.(Success Story) अथक मेहनत परिश्रम आणि घरच्यांची साथ असेल तर मुली यशाचे शिखर गाठू शकतात, हेच या तीन सख्ख्या बहिणींनी दाखवून दिले आहे.
मारुती जाधव सुरुवातीला ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते. काही वर्षांनंतर त्यांनी ऊसतोड मुकादम म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गावात त्यांची जमीन नाही, संपत्तीही नाही. जाधव यांना पाच मुली आणि दोन मुलगे आहेत. एवढे मोठे कुटुंब जगवण्यासाठी कष्ट करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता.(Success Story) आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी आपल्या तिन्ही मुलींना शिकवण्यासाठी अथक मेहनत घेतली. जाधव पती-पत्नी आपल्या लेकींना शिक्षणासाठी पाठिंबा देत राहिले आई-वडिलांच्या कष्टाचे मुलींनी चीज केले.
दरम्यान, जाधव यांची मोठी मुलगी सोनाली हीची कोरोनाच्या काळात पोलीस भरतीमध्ये निवड झाली झाली होती, तर दुसऱ्या दोन मुली शक्ती आणि लक्ष्मी या नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी झाल्या आहेत. तिन्ही बहिणी गेल्या चार वर्षांपासून पोलीस भरतीसाठी कसून सराव करीत होत्या. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणी पोलीस दलात सेवेत दाखल होणे ही बीडमधील पहिलीच घटना असावी.(Success Story)
मेहनत, चिकाटी आणि घरच्यांचा पाठिंबा असेल तर स्त्री यशाचं शिखर पार करु शकते, हे सोनाली, शक्ती आणि लक्ष्मी या बहिणींनी दाखवून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. सेलू तांडा येथील गावकऱ्यांनी तीनही बहिणींचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.(Success Story)