गोंदिया : राज्यात थंडीचे प्रमाण वाढत असून, अनेक शहरांचे तापमान 14 अंशांच्या खाली आहे. अशातच हिवाळ्याचे दिवस असल्याने पहाटे चुलीजवळ बसून अभ्यास करणा-या विद्यार्थीनीचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी मरामजोब या गावात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चांदणी किशोर शहारे (वय 17) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी चांदणी ही देवरी तालुक्यातील मुरदोली येथील शिवराम महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता चुलीजवळ बसून ती अभ्यास करीत होती. दरम्यान, चुलीत अचानक आग वाढली त्या आगीत चांदणी जळाली. तात्काळ चांदणीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रुग्णालयातच शनिवारी पहाटे चांदणीचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती देवरी पोलीसांना देण्यात आली आहे. पोलीसांना अपघाती निधनाची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.