पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार असून सत्ताधारी महायुतीचं सरकार पुन्हा येणार की महाविकास आघाडी बाजी मारणार? याची उत्तरं आजच्या निकालाने मिळणार आहेत. राज्यात महायुतीत भाजपने सर्वाधिक 149 जागेवर आपले उमेदवार उभे केलं आहेत. तर शिवसेनेनं 81 आणि राष्ट्रवादीने 59 जागांवर उमेदवार उभा केले होते. मविआमध्ये काँग्रेसने 101, शिवसेना उबाठा गटाने 95 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 86 जागांवर उमेदवार देण्यात आले आहे. मतदारराजा या वेळी महायुतीला पुन्हा कौल देणार की मविआच्या हातात सत्तेची दोरी सोपवणार? याकडे राज्यातील जनतेसह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
गृह मतदानसह पोस्टल मतदानात वाढ
मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनी मतमोजणीची माहिती देताना सांगितलं की, गृह मतदान, पोस्ट मतदान यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे त्याच्या मोजणीसाठी वेगळी २००० हजार जणांची टीम लावली आहे. ८ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. लवकरात लवकर १०-११ पर्यंत लिडींग कळू शकेल. सुमारे पाच लाख कर्मचारी या संपुर्ण प्रक्रियेत सहभागी होणार आहे. केंद्रीय सुरक्षा बलाच्या ३०० तुकड्या आहेत. निवडणुक आयोग, राजकिय पक्ष आणि मतदार यांच्या संयुक्त प्रयत्नांचे परिणाम आहेत.
स्ट्राँग रूम उघडल्या, ८ वाजता मतमोजणीला सुरुवात
स्ट्राँग रूम ओपन करण्यात आल्या असून काही वेळातच प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात होणार आहे. मतांच्या या पेटाऱ्यातून काय बाहेर निघणार आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून सुरुवातीला टपाल मतमोजणीनंतर ईव्हीएम मशिनची मतजमोजणी होणार आहे. मतदानानुसार अनेक ठिकाणी १७ ते २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.