दिनेश सोनवणे
दौंड : गणेशोत्सवाच्या काळात जर कोणी कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केले. तर त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे. असा इशारा दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलिसांनी दौंड रेल्वे मैदानावर मॉक ड्रिल प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी बोलताना वरील इशारा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला आहे. हे मॉक ड्रिल उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
पुढे बोलताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले कि, आगामी निवडणुका, सन आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलिसांकडून मॉक ड्रिल करण्यात आले आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात आगामी सण-उत्सवांच्या काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दंगा काबू योजना घेण्यात येते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी. व सर्व घटकातील नागरिकांनी कायद्याचे पालन करावे. असे आवाहन घुगे यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, मोब ड्रिल नंतर दौंड शहरातील हुतात्मा चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक ,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक आणि संविधान चौक या परिसरातुन पथसंचलन चे आयोजन करण्यात आले. यावेळी ६ पोलीस अधिकारी, ५८ पोलीस कर्मचारी आणि २० होम गार्ड यांनी सहभाग घेतला होता.