लहू चव्हाण
पाचगणी : रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष स्वप्नील (भाई) गायकवाड यांच्या विरुद्ध खोटी तक्रार व अर्ज करण्याचा प्रयत्न करून त्यांना बदनाम करणाऱ्यांवरोधात कार्यवाही करण्यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा अध्यक्ष संतोष (तात्यासाहेब) गायकवाड यांच्या वतीने पाचगणी पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की मागील अनेक दिवसांपासून आपल्या पाचगणी शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम पाचगणीतील बंटी व बबली टोळी (पूनम निलेश गोळे (काबळे), निलेश गोळे व सराईत गुन्हेगार अनमोल अशोक कांबळे) यांच्या माध्यमातून चालू आहे. यांच्यावर असणारे गुन्हे हीच त्यांची खरी ओळख आहे. खंडणी, दमदाटी, जिवे मारण्याची धमकी अशे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत.
ऍस्ट्रोसिटी, इव्ह टीसींग सारख्या अनेक कायद्यांचा गैरवापर करून पाचगणीकरांना घाबरवून शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडवली आहे. त्याचप्रमाणे मुख्याधिकारी यासारख्या उच्च शासकीय पदावर असणारे पदाधिकारी यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हे त्याचे जिवंत उदहारण आहे. अशाच पद्धतीने स्वप्नील (भाई) गायकवाड यांच्यावर देखील खोटे आरोप करून फसविण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्वप्नील गायकवाड यांनी मागील दोन वर्षात सातारा जिल्हयातील सर्वसामान्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. अशा नेत्याला सुपारी घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न या बंटी बबली.टोळीच्या माध्यमातून चालू आहे.
शासकीय अधिकाऱ्यावर हल्ला झाला तसाच हल्ला स्वप्नील गायकवाड यांच्यावरही करण्याचा कट या टोळी कडून रचला जात आहे अशी दाट शक्यता असल्याने त्यांना पोलिस संरक्षण मिळावे संबंधितांवर कडक कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे.त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास आम्ही देखील आंदोलनाचा मार्ग स्वीकारू, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी विधानसभा अध्यक्ष संतोष गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीनिवास घाडगे, मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील मांढरे, वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे,वाई शहराध्यक्ष किरण घाडगे, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रुपेश मिसाळ,तालुका कार्याध्यक्ष अतिश भोसले, पाचगणी शहराध्यक्ष साजिद क्षिरसागर, महाबळेश्वर जाॅन जोसेफ,काली घाडगे, अमोल महांगडे,राहूल महांगडे, विक्रांत महांगडे,सुरेखा भिसे, अश्विनी भिसे, कुसुम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.