सुरेश घाडगे
परंडा : महाराष्ट्र राज्या बाहेर उच्च शिक्षण घेत असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करण्याबाबत राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या परांडा शाखेच्या यांचे वतीने सोमवार ( दि. ११ ) परंडा तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ओबीसी महासंघाचे परंडा तालुका अध्यक्ष तानाजीराव तरंगे, शिवाजीराव पंडित, धनाजी खरात, धन्यकुमार सुतार , संजीव मुसळे, शिवाजी वाघमारे, गणेश भाग्यवंत, गणेश अलबत्ते, विजयकुमार माळी,रविराज राठोड, अंबादास विरोधे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या आणि परराज्यात खाजगी विनाअनुदानित व कायम अनुदानित संस्थेत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासवर्ग या विद्यार्थ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून ही शिष्यवृत्ती योजना लागू केलेली होती.
परंतु आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने हे परिपत्रक रद्द केल्याने ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. सततच्या वाढत चाललेल्या महागाईमुळे ती अडचण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सदरील शिष्यवृत्ती योजना पुन्हा लागू करून ओबीसी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी. यासाठी सकल ओबीसी महासंघाचे वतीने निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले.