पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच आहेत. यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पुणे-सातारा महामार्गावरील देगाव फाट्यावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याहून साता-याकडे जाणा-या कंटेनरची एका कारला धडक बसली होती. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशा चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून साताऱ्याकडे एक कंटेनर हा भरधाव वेगात जात होता. यावेळी चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने तो कंटेनर कारला जाऊन धडकला. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या घटनेनंतर कार थेट पुलाच्या मध्यभागी जाऊन अडकली. यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमी नागरिकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. या अपघाता जखमी झालेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाही. राजगड पोलिसांनी घटनास्थळी जात अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. तसेच वाहतूक कोंडी देखील सुरुळीत केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.