soyabean news :अकोला : विदर्भात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याच चित्र आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. साठवून ठेवलेला सोयाबीन एकदम बाहेर काढल्याने मागणी वाढून भाव पडल्याची शक्यता आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार दिवसात सोयाबीन दरात ४१० रुपयांनी घसरण झाली आहे.
डिसेंबरच्या पहिल्या दिवशी सोयाबीनला जास्तीत जास्त ५ हजार १६५ रूपये तर सरासरी भाव ४ हजार ९०० रुपये इतका होता. आज ६ डिसेंबर रोजी सोयाबीनला कमाल भाव ४ हजार ७५५ रूपये असून सरासरी भाव ४ हजार ५८० रूपयांपर्यंत असून बाजारात सोयाबीनची आवक वाढत आहे. त्यामुळ बळीराजा गरजेपुरते सोयाबीन विकून बाकीचे घरात ठेवत आहे. मात्र सोयाबीन दरामध्ये होत असलेली घसरण बघता शेतकऱ्यांनी आता साठवलेलं सोयाबीन बाहेर काढलं आहे. अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सद्यस्थितीत शेतकऱ्यांना बसतोय. कापूस व सोयाबीनसारख्या पिकांना भाव नाहीये. त्यामुळ बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला. या हंगामात पावसाची मर्जी, मध्येच मारलेली पावसानं दडी, शेतकऱ्यांसमोर आलेली दुबार पेरणी, ती करूनही म्हणावे तसे पीक हाती आलेच नाही. कारण यंदा सोयाबीनवर ‘यलो मोझॅक’चे आक्रमण झालं, त्यामुळ सोयाबीन उत्पादनाला फटका बसला. ज्यांना ३ ते ४ क्विंटल सोयाबीन होतं त्यांना २ ते ३ क्विंटल सोयाबीन झालं. त्यामूळ उत्पादन खर्च निघेल एवढाही दर मिळेनासे झालाय. तर कापूस फारसा समाधानकारक झाला नाहीये. आता अतिवृष्टीमुळे त्याचही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यात सणासुधीचा काळ आणि डोक्यावर असलेलं कर्ज फेडण्यासाठी बाजारात मिळेल त्या भावात विकण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. त्यामुळ शेतकऱ्यांना दुहेरी फटका सहन करावा लागला.