मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. तेव्हापासून हे कपल जास्त चर्चेत आलं. लग्न झाल्यापासून हे कपल सतत विदेशात फिरताना दिसत आहे. नुकतेच सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला 6 महिने पूर्ण झाली आहेत. याचनिमित्ताने सोनाक्षीने जहीरसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
सोनाक्षी आणि झहीर यांचा 23 डिसेंबरच्या दिवशी विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला 6 महिने पूर्ण झाले आहेत. या कपलने लग्नाला 6 महिने झाल्यानिमित्त परदेशात जबरदस्त सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरी शेअर करत नवऱ्यासोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोला अभिनेत्रीने “हॅप्पी सिक्स मंथ जान…” आणि पुढे हार्ट इमोजी देत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केला आहे. लग्नाला 6 महिने झाल्यानिमित्त सोनाक्षी आणि झहीरने ऑस्ट्रेलियामध्ये सेलिब्रेशन केलं आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या ह्या इन्स्टा स्टोरीची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत असून त्यांच्यावर कमेंट्सचाही वर्षाव केला जात आहे.
दरम्यान, सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली. चित्रपटात सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांची जोडी चाहत्यांना आवडते. सोनाक्षी आणि झहीरची पहिली भेट देखील सलमान खानच्या घरीच झाली होती.
Happy 6 Months Jaan ♥️ pic.twitter.com/2alPKXpv62
— Sonakshi Sinha (@SonakshiSinha) December 23, 2024