जीवनात विविध स्वभावाचे लोक आपल्याला भेटतात. काही चांगले तर काही वाईट. तर काही लोक फसवणारेही असू शकतात. तुम्हाला हे लोक कधीही फसवू शकतात. त्यामुळे काही चिन्हे तुम्हाला दिसताच लगेच सावध होण्याचा सल्ला दिला जातो. नाहीतर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
जे लोक आपल्या शब्दांवर आणि आश्वासनांवर मागे फिरतात, ते फसवे देखील असू शकतात. असे लोक त्यांच्या वचनबद्धता अर्थात कमिटमेंटचे पालन करत नाहीत आणि कधीही कोणाचीही फसवणूक करू शकतात. म्हणून, जे लोक आपला शब्द पाळत नाहीत त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. फसव्या लोकांचे एक प्रमुख लक्षण म्हणजे ते अनेकदा तर्कहीन गोष्टी करतात. त्यांच्या बोलण्यात ताळमेळ नसतो आणि एक गोष्ट दुसऱ्याशी जुळत नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये असे वर्तन वारंवार दिसले तर त्याच्यापासून सावध राहावे.
जे लोक फक्त स्वतःबद्दल विचार करतात आणि इतरांची काळजी करत नाहीत ते देखील फसवणूक करू शकतात. असे लोक त्यांच्या फायद्यासाठी कोणाचाही वापर करू शकतात. त्यामुळे स्वार्थी वर्तन दाखवणाऱ्या लोकांपासून सावध रहा. खोटे बोलणे हे फसवणुकीचे लक्षण असू शकते. जर एखादी व्यक्ती वारंवार खोटे बोलत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते.