Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur Farmers Protest: जिल्ह्यात ऊसदरासाठी आंदोलन तीव्र; शेतकरी नेते पंढरपूरकडे रवाना 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 13 December 2025, 16:28
Solapur Farmers Protest: The agitation for sugarcane prices intensifies in the district; farmer leaders have left for Pandharpur.

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पुन्हा एकदा पेटू लागला आहे. आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी नेते समाधान फाटे यांची तब्येत सहाव्या दिवशी खालावली आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी नेते आणि कार्यकर्ते पंढरपूरकडे रवाना झाले असून आंदोलन (Solapur Farmers Protest) अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसुन येत आहेत.

 

सहाव्या दिवशी फाटे यांची प्रकृती गंभीर

ऊसाला साडेतीन हजार रुपये पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी समाधान फाटे यांच्यासह त्यांचे तीन सहकारी गेले सहा दिवस वाखरी पालखी तळावर आमरण उपोषणाला बसले आहेत. सहाव्या दिवशी फाटे यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांनी आजपासून वैद्यकीय उपचार घेणेही थांबवले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू ठेवू न देण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

सोलापूरातील ऊस सातारा, पुणे जिल्ह्यांत

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील ऊस शेजारच्या सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर तसेच पुणे जिल्ह्यातील निरा-भीमा परिसरातील साखर कारखान्यांकडे वळू लागला आहे. त्या ठिकाणी ऊसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सीताराम आणि पांडुरंग सहकारी साखर कारखाने बंद पाडले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन दोन्ही कारखान्यांनी पहिली उचल वाढवून तीन हजार रुपये जाहीर केले आहेत.

तसेच आंदोलनाचा फटका बसू नये म्हणून बबनराव शिंदे यांनी त्यांच्या दोन्ही कारखान्यांवर, तर आमदार अभिजीत पाटील यांनी त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर तातडीने तीन हजार रुपयांपेक्षा जास्त पहिली उचल जाहीर केल्याची माहिती मिळत आहे. आंदोलन पुढील काही तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

“एक युग संपलं!” आशा भोसलेंच्या जाण्याने बिग बींना मोठा धक्का, सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनातील भावना

Monday, 13 April 2026, 18:13
Trimbakeshwar

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांना गंडा! 3 हजारांची फसवणूक; एकाला बेड्या, तर दुसरा फरार

Monday, 13 April 2026, 18:08
shikrapur

shikrapur : मंगळसूत्र लूट प्रकरणातील आरोपीला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Monday, 13 April 2026, 17:50

आशा भोसलेंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाचा मोठा निर्णय; पुण्यात आज सायंकाळी हृदयनाथ मंगेशकर करणार मोठी घोषणा

Monday, 13 April 2026, 17:49

Loni Kalbhor Crime: कुंजीरवाडीत पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 17:31
PMPML Bus

Pune : लोकसंख्या वाढली पण बस घटल्या! 1 लाख नागरिकांमागे हव्यात 60, पुण्यात आहेत फक्त 22 बस; सार्वजनिक वाहतुकीचे धिंडवडे

Monday, 13 April 2026, 17:21
Next Post

Kis Kisko Pyaar Karoon 2: 'किस किस को प्यार करू 2'ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाई घसरली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.