Kis Kisko Pyaar Karoon 2: धुरंधर चित्रपटाने आठवड्याभरातच 200 कोटीहून जास्त कमाई केली. काल शुक्रवारी थिएटरमध्ये दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामध्ये कपिल शर्मा यांचा ‘किस किसको प्यार करू 2’ आणि शोले हा चित्रपट पून्हा प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षकांना या दोन्ही चित्रपटाची उत्सुकता लागली होती.

कपिल शर्मा स्टारर ‘किस किसको प्यार करूं 2’ या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई निराशाजनक ठरली आहे. बॉक्स ऑफिसच्या अहवालानुसार, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी सुमारे 1.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करूं’ या पहिल्या भागाने पहिल्याच दिवशी 10.2 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे सिक्वेलला मिळालेली ओपनिंग पहिल्या भागाच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे.
कपिल शर्मा यांच्या चित्रपटावरून अनेक प्रेक्षकांनी समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींना चित्रपटातील विनोद आवडले असले तरी, एकूणच चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. निर्मात्यांकडून अद्याप चित्रपटाच्या बजेटची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, काही माध्यमांच्या माहितीनुसार हा चित्रपट सुमारे 35 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.
चित्रपटात कपिल शर्मा हा मूख्य भूमिकेत असून त्यांने अप्रतिम अभिनय केला असल्याचे प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत आहे. या वीकेंडलाही बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ चित्रपटाने कमालीची कमाई केली आहे.






