युनुस तांबोळी
Shirur News : आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मुस्लिम बांधवांनी सामाजिक व धार्मिक सलोखा जतन करत ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निश्चय केला आहे.(shirur News)
ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निश्चय केला आहे
ईदच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बानी करून बकरी ईदची परंपरा जोपासण्यात येईल. असेही काही बांधवाकडून सांगण्यात आले. दोन्ही पवित्र सणांचे धार्मीक पावित्र राखण्याचा प्रयत्न केला जाणार असून आषाढी निमित्त मासां ची दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.(shirur News)
आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने ‘ईश्वर अल्ला तेरो नाम सबको संमती दे भगवान असेच काहिसे वातावरण या दोन सणांच्या धार्मिक पावित्र्यात राहणार आहे. बकरी ईद निमित्त कुर्बानी करण्याची प्रथा आहे. बकरी ईद च्या दिवसात पुढील दोन दिवस असे सलग तीन दिवस कुर्बानीचा विधी केला जातो. त्यागाचे प्रतीक म्हणून पुरातन काळापासून कुर्बानी करण्याची प्रथा रूढ झालेली आहे. पुराणातही त्याचा उल्लेख आहे.(shirur News)
मलठण (ता. शिरूर) येथील मुस्लीम जमात ने शुक्रवारी झालेल्या नमाज पठण वेळी एकत्रीत येऊन बकरी ईद च्या दिवशी कुर्बानी विधी न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आसिफ आत्तार यांनी सांगितले. या दिवशी मासं विक्री केली जाणार नाही. सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यांच्या या निर्णयाने हिंदू बांधवाकडून त्यांचे कौतूक केले जात आहे.(shirur News)
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सुन्नी मुस्लिम जमातच्या वतीने ईद च्या दिवशी कुर्बानी करण्यात येणार नसल्याचे येथील हनिफ आत्तार व दगडूभाई हवालदार व लाला शेख यांनी दिली.(shirur News)
कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील मुस्लिम जमात च्या वतीने ईदच्या दिवशी कुर्बानी केली जाणार नाही. यंदा आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने ईदच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करण्यात येणार असल्याचे ओबीसी संघटनेचे तालुकाध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांनी सांगितले.(shirur News)
कवठे येमाई (ता. शिरूर) येथील सुन्नी वल मुस्लिम जमात च्या वतीने आषाढी एकादशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जमातीचे अध्यक्ष आर. के. मोमीन यांनी सांगितले.
दोन्ही समाजाच्या बांधवांकडून भाईचारा जपत सण साजरा करण्याचा निर्णय घ्यावा. शासनाने दिलेल्या नियमानूसार दिलेल्या बंदिस्त जागेत कुर्बानी विधी करावा. सगळ्यांनीच शांतता व सामाजीक सलोखा राखावा. असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी केले आहे.(shirur News)