शिरूर : शिरूर तालुक्यातील पोलीस प्रशासनाच्या गैरकारभाराविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे हे पुन्हा १५ ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.
शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केलेल्या विविध गैरप्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी आझाद मैदान येथे १० दिवस बेमुदत आमरण उपोषण केले होते.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या घटनेची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. याविरोधात भोरडे हे प्रांत अधिकारी कार्यालय पुणे येथे १५ ऑगस्ट २०२२ पासून पुन्हा उपोषणास बसणार आहेत.
दरम्यान, दोन्ही पोलीस निरीक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रकार चालू आहे, कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख गप्प का आहेत. याच्या मागचे गौड बंगाल काय आहे. पुणे जिल्ह्यातील पोलीस दलासह पुणे जिल्ह्यातील नागरिकांना कळायला तयार नाही. असा सवाल अशोक भोरडे यांनी केला आहे.