नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. दिल्लीतील एम्समध्ये दाखल येचुरींना कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. ७२ वर्षीय येचुरींवर एम्सच्या आयसीयूमध्ये श्वसननलिकेच्या संसर्गावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचे माकपकडून सांगण्यात आले. येचुरींना न्युमोनियाची लागण झाल्याने १९ ऑगस्ट रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.