सुरेश घाडगे
परंडा : परांडा शहरातील विजयादशमी गारभवानी मंदिर बार्शी रोड येथे शस्त्र पुजन करुन धार्मिक विधीने बुधवारी (ता. ०५) साजरी करण्यात येणार आहे. सायंकाळी सिमोल्लंघन तथा शहरातील भावीकभक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या गारभवानी मंदिर बार्शी रोड, गारभवानी मंदीर शिक्षक सोसायटी, भवानी शंकर मंदिर राजपुत गल्ली व भगवती मंदिर तसेच तालुक्यातील डोंजा येथील रेणूकामाता मंदीर, सिरसाव येथील महालक्ष्मी मंदिर व आवार पिंपरी येथील अंबाबाई मंदिर येथे नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. व विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
शहरातील बार्शी रोड जवळ असलेल्या गारभवानी मंदिरातील मूर्ती गारगुटीतून कोरलेली आहे. त्यामूळे या देवीला गारभवानी म्हटले जाते. अनेक भाविकभक्त मोठ्या श्रद्धेने नवस करतात. कोणी पुरणपोळी तर कोणी बकरा बळी नैवेद्य देऊन नवस पूर्ती करतात . भाविकांची नवरात्रात दररोज मोठी गर्दी असते. तहसिलदार व पोलीस निरिक्षक यांना विजयादशमी पुजनाचा मान दिला जातो . तसेच शिक्षक सोसायटी जवळील गार भवानी मंदिरात ही गारगुटीची मुर्ती आहे.
१९५४ साली स्व. पांडूरंग थोरबोले यांच्या शेतात त्यांच्या पत्नी रुक्मीणबाई यांना गवतात गार गुटीचा ढिगारा दिसून आला होता. त्यांनी तो ढिगारा उकरला असता त्यांना देवीच्या दोन मुर्ती सापडल्या तसेच एक लाकडी करंडा ही सापडला . त्यांनी मोठया भक्तिभावाने मुर्ती प्रतिष्ठापणा केली .थोरबोले कुटूंब व भाविक यांनी पुढाकार घेऊन मंदिर बांधले.आष्टभुजा भवानी माता मुर्तीची प्रतिष्ठापणा करून मंदिराचा जिर्णोधार करण्यात आला आहे. अशी माहिती संजय थोरबोले यांनी दिली.
शहरापासुन जवळच असलेल्या ऐतीहासीक पुरातान भगवती देवी हे रेणुका मातेचे ठाण माणले जाते.मंदिराचा जिर्णोद्वार करण्यात आला आहे.मंदिरात नवरात्र निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. मंदिराच्या बाजुला दोन चिरेबंदी विहीरी आहेत. त्यांना सासु व सुनेची विहीर असे संबोधले जाते. या ठिकाणाहुन परंडा भुईकोट किल्ल्यात भुयारी मार्ग असल्याचे म्हटले जाते.
दरम्यान, भाविकाची दर्शनासाठी गर्दी असते.शहरातील सोमवार गल्ली परिसरात देशमुख यांच्या वाड्यात रेणुका देवीचे ठाण असुन नवरात्री निमित्त भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. तालुक्यातील डोण्जा येथे रेणूका माता ऐतिहासिक मंदिर सिना, खैरी व नळी या त्रिवेणी नद्यांच्या संगमाच्या नदी काठावर हे मंदिर आहे. डोण्जा गावचे हे ग्रामदैवत असून परिसरातील गावातील ग्रामस्थ ही दर्शनासाठी येतात. नवरात्रात विविध कार्यक्रम घेण्यात आले.