दीपक खिलारे
इंदापूर : पुणे जिल्ह्यातील दौंड येथील खाटीक समाजातील भगिनीची छेडछाड करुन मारहाण केल्याच्या निषेधार्थ तसेच घोलप व जमदाडे या दोन कुटुंबियांना मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन गाव सोडून जाण्यास धमकी देण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ इंदापूरमध्ये हिंदू खाटीक समाजाच्या वतीने मंगळवारी (दि.२२) तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी शहरातील खाटीक गल्ली येथून मूक मोर्चास सुरुवात झाली. जुना पुणे-सोलापूर महामार्गावरुन तहसील कार्यालयावर मूक मोर्चा नेण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी या घटनेतील सबंधित गुन्हेगारांवर कठोरात- कठोर कारवाई करावी या मागणीचे नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना निवेदन देण्यात आले.