लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील 15 नंबर जवळ असलेल्या लक्ष्मी कॉलनी जवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. हा प्रकार रविवारी (ता.8) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. यामुळे चालकांचा जीव टांगणीला लागला असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लक्ष्मी कॉलनी जवळील सिग्नल वाहतूक कोंडी सुरळीत राखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बसविण्यात आला आहे. या सिग्नलवर हडपसर वाहतूक पोलिस कर्तव्य बजावित असतात. मात्र, रविवारी दुपारच्या सुमारास सिग्नलचा अचानक बिघाड झाला आहे. व वाहनांसाठी जाण्यासाठी व थांबण्यासाठी एकाच वेळी सूचना देत आहे. त्यामुळे चालकांनी सिग्नल ला थांबावे की पुढे जावे. अशा द्विधा मनस्थितीत अडकला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.
प्रशासनाने या ठिकाणी अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे कोडे कधी सुटणार की, दुर्घटना घडल्यावरच प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा अहवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.