उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) येथील सिद्धेश मारूती चौधरी (वय-१९) याने ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ वेटलिफ्टिंग प्रकारमध्ये कांस्यपदक पटकाविले आहे. सिद्धेशने मिळविलेल्या यशाबद्दल त्याच्यावर राजकीय, सामाजिक व क्रीडाक्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
गुहाटी (आसाम ) येथे ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३’ स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी सिद्धेश चौधरी याने सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील 400 मीटर धावण्याच्या अडथळा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.
सिद्धेश चे वडील मारूती चौधरी हे प्रगतशील शेतकरी असून त्यांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय शेती आहे. सिद्धेशचे प्राथमिक शिक्षण नायगाव येथील शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण पुरोगामी विद्यालयात झाले. सिद्धेशने मिळविलेल्या यशामुळे त्याच्यावर नायगाव व पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.