मुंबई : राज्यातील मुली आणि महिलांसाठी सरकारने आतापर्यंत विविध योजना राबवल्या आहेत. त्यातच आता लवकरच “श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना “सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही योजना 8 मार्च रोजी जन्मलेल्या मुलींसाठी असणार असून सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्यावतीने ही अनोखी योजना राबवण्यात येणार आहे.
‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी’ योजनेचा प्रस्ताव मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने राज्य सरकारला पाठवला आहे. या योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिल्यास सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने ही योजना राबवण्यात येणार आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून लेख वाचवा, लेकीला शिकवा या स्वरूपाच्या धोरणाला हातभार लावण्यासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने हे पाऊले चालले आहे. दरम्यान न्याय व्यवस्थापन समितीकडून अशा स्वरूपाची अभिनव योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
राज्यातील गरजू मुलींसाठी सिद्धिविनायक मंदिराच्या वतीने ही अनोखी योजना सुरू करण्यात येणार आहे. आठ मार्चला जन्मलेल्या मुलींच्या नावाने 10 हजार रुपयांची मुदत ठेव या योजनेतून केली जाणार आहे. ‘लेक वाचवा लेक शिकवा ‘या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी सिद्धिविनायक ट्रस्टकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.